छत्रपती संभाजी नगर, दिनांक ३०- गुंगीकारक औषधी गोळयांची नशा करण्यासाठी अवैधरित्या विक्री करणारा ईसम स्थानिक गुन्हे शाखेने केला जेरबंद केला. छत्रपती संभाजीनगर (ग्रा) पोलीसांनी ही धडाकेबाज कारवाई केली.
दिनांक-29/10/2025 रोजी पोलीस ठाणे चिकलठाणा हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे गस्त करीत असतांना स्था.गु.शाचे पोलीस निरीक्षक श्री. विजयसिंह राजपूत यांना त्यांचे गोपनीय बातमीदार यांचेकडुन माहिती मिळाली की, छत्रपती संभाजीनगर ते पैठण जाणारे रोडवरील मौजे गेवराई शिवारातील आलाना कंपनीसमोरील वस्तीमध्ये एक इसम नशा करण्यासाठी अवैधरित्या औषधी गोळयांची विक्री करत आहे. अशी खात्रीलायक बातमी मिळाली.
यावरून स्था.गु.शाचे पोनि विजयसिंह राजपूत यांनी सदरची बातमी बाबत माहिती वरीष्ठ अधिकारी यांना देऊन सापळा कार्यवाहीचे नियोजन करुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास तात्काळ मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने कार्यवाही कामी रवाना झाले पथकाने सदर घटनेची एन.डी.पी.एस. कायद्याप्रमाणे छापा कारवाईकामी शासकीय पंच, अन्न व औषध प्रशासन विभाग, न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळा, यांचेशी संपर्क करुन नियमाप्रमाणे सर्व पुर्तता करुन रात्री उशीरा बातमीदाराकडुन मिळालेल्या गुप्त बातमीचे ठिकाणी जाऊन अचानक छापा मारला असता सदर ठिकाणी ईसम नामे बालासिंग करमसिंग टाक वय 48 वर्ष रा. ब्रुक बॉन्ड आलाना गेवराई ता. जि. छत्रपती संभाजीनगर याचे जवळ औषधीसाठा (गोळया) बाळगण्याचा कोणताही परवाना नसतांना व औषधीसाठा खरेदी केल्याचे बिल नसतांना किंवा डॉक्टरांचे प्रिसक्रिप्शन नसतांना त्याने वरील वर्णनाचा औषधी साठा 48 स्ट्रीप (480 गोळया) किंमती 48000/- रूपये प्रत्येक स्ट्रीप मध्ये 10 ऑरेंज रंगाच्या गोळ्या प्रत्येक स्ट्रीप वर Alprazolam Tablets L.P. 0.5 mg OHMS ALPHA 0.5 Tablets 0.5 mg असे इंग्रजीत लिहिलेले विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या कब्जात बाळगल्या. सदर इसमास त्याचे ताब्यात मिळत आलेला औषधी साठा ( गुंगीकारक गोळ्या) हा मानवी जिवनास व शरीरास अपायकारक असल्याचे व त्याचा नशा करण्यासाठी वापर होत असल्याची जाणीव असतांना सद्धा त्यांनी तो साठा विक्री करण्याच्या उद्देशाने घरात जवळ बाळगतांना मिळून आला नियमाप्रमाणे पंचासमक्ष पंचनामा करुन आरोपीस मुद्देमालासह पो.स्टे. चिकलठाणा येथे हजर केले.
नमद आरोपीविरूद्ध गंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अन्वये पोस्टे चिकलठाणा येथे गुरनं. 544/2025 कलम (NDPS Act) अधिनियम 1985 कलम 8 (c). 22 (a), सह कलम 123, 278 भा.द.वि. सह कलम 18 (A), 18 (c), 27 (B) (ii) औषधी व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस ठाणे चिकलठाणा पोलीस अधिकारी हे पुढील अधिक तपास करीत आहेत.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री.डॉ. विनयकुमार मे. राठोड, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपूर्णा सिंह मॅडम, यांचे मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विजयसिंह राजपुत, सपोनी संतोष मिसळे, पोह/200 सचिन सोनार, पोह/1131 रविंद्र लोखंडे, पोह/1380 अंगद तिडके, पोह/629 गोपाल पाटील, पोह/206 सुनिल गोरे, पोह/1448 सुरोशे, मपोह 999 सरला जाधव, पोअं./1522 दुबिले, पोअं./1635 खरात, पोह/1777 निलेश कुडे तसेच श्री. मनोज पैठणे निरीक्षक अन्न व औषधी विभाग हे कार्यवाही कामी हजर होते. नमुद सर्व अधिकारी व अमलदार सदर कार्यवाहीस हजर होते.
टिप्पणी पोस्ट करा